वाढदिवस कार्यक्रमातुन कोरोना संसर्ग पसरविणाऱ्या भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षावर कारवाई करा

0
322
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

घुग्घुस : देशात व राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असतांना देखील भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस 21 नोव्हेंबर रोजी गांधी चौक घुग्घुस येथे 21 किलो केक कापून आतिषबाजी करून कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत साजरा करण्यात आला.
या वाढदिवस कार्यक्रमात स्वतः जिल्हाध्यक्षाने तोंडावर साधा मास्क सुद्धा लावण्याचे औचित्य दाखवले नाही.

यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान कार्यक्रमात रक्तदाता भाजप पदाधिकारी कोरोना संक्रमित मिळाला त्यांनी रक्त दिलेल्या बेडवर शेकडो रक्तदात्यांनी रक्त दिले त्यामुळे मोठ्या प्रमाणात घुग्घुस परिसरात कोरोनाचा संसर्ग पसरत आहे भाजप पक्षाचे महिला सभापती यांच्या कुटुंबासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते हे संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. यातील बहुतांश कोरोना बाधित हे किराणा, झेरॉक्स, पेट्रोल पंप या सारख्या विविध प्रकारचे जनसंपर्कात येणारे व्यापारी असल्याने धोका जास्त वाढला आहे.

या कार्यक्रमात शेकडो लोकांनी रक्तदान केले व संपूर्ण घुग्घुस व परिसरातील लोक या कार्यक्रमात उपस्थित होते त्यामुळे पूर्ण शहर हा कोरोनाग्रस्त होण्याची भंयकर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर भार पडत आहे.
या वाढदिवस कार्यक्रमा नंतर झालेला कोरोनाचा विस्फोट जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून संसर्गात आलेल्या पदाधिकाऱ्यांना गृह विलगिकरणात ठेवण्या करिता जिल्हाध्यक्ष दबाव टाकत असल्याची ही दबक्या आवाजात घुग्घुस येथील नागरिकांत चर्चा आहे. ही वास्तुविकता आहे की अफवा यांची ही चौकशी करण्यात यावी.

मूल तालुक्यातील जाणाळा येथे लग्नात 50 पेक्षा दहा – वीस पाहुणे जास्त आले व त्यामध्ये एक दोन कोरोना बाधीत निघाले म्हणून गरीब कुटुंबावर गुन्हा नोंदविण्यात आला ओबीसी मोर्च्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या वाढदिवस कार्यक्रमात जवळपास 20 च्या आसपास किंवा जास्त भाजप पदाधिकारी सदस्य व नागरिक कोरोना बाधित झाले असल्याने यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही ?

यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी.
व या कार्यक्रमात हजर असलेल्या सर्व लोकांची कोरोना चाचणी RT – PCR करवून याचा संपूर्ण खर्च वाढदिवस साजरा करणाऱ्या कडुन वसूल करण्यात यावी अशी मागणी आज दिनांक 07 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना घुग्घुस शहर अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी निवेदनातुन केली आहे.