गुप्ता वॉशरीज विरोधात आज ठिय्या आंदोलन

घुग्घुस : येथील स्थानिक चालक – मालक यांच्या जवळपास दीडशे वाहनाला कोळसा वाहतुकीचे काम देण्यात यावे या मागणी करिता आज घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12 वाजता शेकडो ट्रॅक चालक मालक आपल्या वाहनासह गुप्ता वॉशरीजच्या मेन गेटवर ठिय्या आंदोलन करणार आहे.

कंपनीतील मोठे ट्रान्सपोर्टर हे स्थानिक छोट्या ट्रान्सपोर्टरचे शोषण करण्यात येत आहे.
एकीकडे डीजलचे दर प्रति दिवशी वाढत असतांना वाहतूक भाड्यात मोठी कपात केली जात आहे.
यामुळे स्थानिकांना सरळ कोळसा वाहतुकीचे काम देण्याचा मागणी करीता सदर आंदोलन करण्यात येत आहे.