गुप्ता वॉशरीज विरोधातील काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाला यश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : महामीनरल मायनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लि. गुप्तां वॉशरीज उसगाव युनिट येथे काल घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे भरपावसात स्थानिक चालक – मालक यांना रोजगार देण्यासाठी दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते आंदोलनाची दखल घेत घुग्घुस पोलीस स्टेशन ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मध्यस्थीने आज दुपारी एक वाजता पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार राहुल गांगुर्डे, वॉशरीज व्यवस्थापक शशी गुप्तां, सुयोग बिडलावार, संजय सरागे, काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर चालक – मालक संघटनेचे श्रीनिवास गोस्कुला, राकेश खोब्रागडे,रियाज खान यांच्यात संयुक्त बैठक झाली जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत स्थानिक चालक – मालक यांना कोळसा वाहतुकीचे नियमित कामे देण्याची मागणी वॉशरीज व्यवस्थापकांनी मान्य केली.

असून सोमवारी लिखित करार करून सर्व स्थानिक चालक – मालक यांचा रोजगार शुरू करण्यात येणार आहे. स्थानिक रोजगाराची चिंता दूर झाल्याने चालक – मालक असोसिएशनने काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आभार मानले