पुगलिया यांनी केली शासनाची दिशाभूल, तहसीलदारांनी ठोठावला 16 लाखांचा दंड

0
875

चंद्रपूर : 11 जून 2020 रोजी अमित अनेजा यांनी नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात अवैधरित्या रेती साठवणूक केली असल्याची तक्रार दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार व तलाठी यांनी मोका चौकशी करून अहवाल कार्यालयात सादर केला.
अहवाल सादर झाल्यावर 15 जूनला नायब तहसीलदार व पथकांनी मौजा महाकुरला स्थित आरएमसी प्लॉट येथे भेट दिली, 190 ब्रास रेती ही अवैधरित्या साठवणूक केल्याची बाब निदर्शनास आली, त्या रेतीसाठ्याचा पंचनामा करीत जप्त करण्यात आली व व्यवस्थापक साहेबराव जाधव यांचे बयान नोंद करण्यात आले.
या प्रकरणात गैरअर्जदार एम.एम. पुगलिया यांना अवैध रेतीसाठ्याबद्दल नोटीस देत लेखी स्पष्टीकरण द्या असा आदेश देण्यात आला.
पुगलिया यांनी लेखी स्पष्टीकरण दिले परंतु मोक्यावर आढळलेला अवैध रेतीसाठा माझा नसल्याचे मान्य केले.
त्यानंतर पुढील कारवाई जिल्हा खनिकर्म यांच्या कार्यालय यांचेकडे सादर करीत पुगलिया यांचेकडून प्राप्त रेतीसाठ्याच्या पावत्यांची पडताळणी करण्यात आली असता 190 ब्रास पैकी 36 ब्रास रेती ही वैध असून उर्वरित 154 ब्रास रेती अवैध ठरविण्यात आली.
यावर तहसीलदार गौड यांनी पुगलिया यांचेवर दंडात्मक कारवाई करीत 16 लाख 78 हजारांचा दंड ठोठावला.
या कारवाईवरून रेती अवैधपणे साठवणूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.