स्थानिकांना रोजगार न दिल्यास WCL ची वाहतूक बंद करणार

0
426
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घूस : वेकोलीच्या कोलगाव परियोजने अंतर्गत सदभाव इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत घुग्घूस परिसरातील स्थानिक ट्रॅक चालक व मददनीस तसेच सुपरवायजर 2017 ते 2020 पर्यंत कार्यरत होते.

कोरोनाच्या महामारीत देखील आपल्या कुटुंबातील पर्वा न करता कंपनीला सेवा दिली.
मात्र कंपनीचे काम काही कारणास्तव बंद झाले व त्यांच्या ऐवजी हरीराम गोतारा (HRG) या कंपनीला देण्यात आला. या नवीन कंपनीने स्थानिक कामगारांना घेण्यास टाळाटाळ करीत असून बाहेरील कामगारांना कामावर घेत आहे.

यामुळे स्थानिक कामगारात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. याची दखल घेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अनुसूचितजाती विभागा तर्फे वे.को.ली. मुख्य महाप्रबंधक तसेच सब एरिया मॅनेजर यांना शिष्टमंडळा सह निवेदन देण्यात आले.

येत्या आठ दिवसांत स्थानिकाना न्याय न मिळाल्यास वेकोलीची तसेच हरीराम गोतारा कंपनीची वाहतूक रोखून धरण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी काँग्रेस अनुसूचित विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, राजूरेड्डी घुग्घूस काँग्रेस अध्यक्ष, रोशन पचारे किसान सेल जिल्हाध्यक्ष, कामगार नेते सैय्यद अनवर, सुरज बहुराशी (शहर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग) विलास ठाकरे, मुस्तकींम खान, दीपक दुर्गे, राकेश आगदारी, रवींद्र देशकर,राकेश दुर्गे,प्रीतम अट्टेला, इरफान शेख, व मोठया संख्येने स्थानिक कामगार उपस्थित होते.