ग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास कामांचे भूमिपूजन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर : मागील दोन वर्षात ग्रामीण भागाच्या विकासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून काही कामे प्रगतीपथावर आहे. तर काही कामे प्रस्तावीत आहे. ग्राम विकास निधीसह इतर निधीतून या भागांमध्ये होत असलेल्या विकास कामातून ग्रामणी भागातील नागरिकांचे जिवनमान नक्कीच उंचावेल. पुढेही ग्रामीण क्षेत्रात अनेक मोठी कामे करायची असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून ग्राम विकास निधी अतंर्गत ग्राम पंचायत कोसरा (खुटाळा) आणि मोरवा येथील सिमेंट काॅंक्रिट रोडच्या कामांसाठी 100 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गणपत कुडे, जंगलु पाचभाई, प्रभाकर धांडे, भास्कर नागरकर, धनराज हणुमंते, धनंजय ठाकरे, विलास भगत, प्रभाकर पिंपळशेंडे, राकेश पिंपळकर, अमित देवतळे, प्रशांत लाकडे, गणेश दिवसे, युवराज कुडे, मनोज पिंपळकर, शंकर वरारकर, नंदकिशोर वासाडे, अरुण तुराणकर, मनोहर जाधव, डाॅ. रमेश व-हाड, रुपेश झाडे, वृषभ दुपारे, चंद्रकांत खांडरे, विजय मत्ते, गणेश जोगी, सचिन लोडे, परशूराम सुर, निळकंठ भोयर, प्रशांत नवघरे, राजू खंडारकर, मनोज दरेकर, प्रविण सिंग, विक्की रेगंटीवार, अभिजित चंदेवार, नकुल वासमवार, सायली येरणे आदि मान्यवरांची प्रमूख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, कोरोणाच्या संकटामूळे विकास कामांची गती मंदावली, असे असतांनाही विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी मोठा निधी आणता आला. या निधीतून चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातील विकास कामे केल्या जात आहे.

कोरोना संकटात आमदार निधीतील एक कारोड रुपये देत आपण वन अकादमी येथे सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालय सुरु केले आहे. भविष्यात शहरी भगासह विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भगातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. मागील दिड महिण्यात ग्रामीण भागातील जवळपास अडिच कोटी रुपयांच्या विकास कामाचे आपण भूमिपूजन केले आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहे. हे सर्व कामे होत असतांना कामाच्या दर्जाकडेही लक्ष देण्याच्या सुचना मी संबधीतांना केल्या आहे.

ग्रामपंचायत कोसारा (खुटाळा), व मोरवा येथील रस्त्यांची अनेक कामे प्रलंबीत होती. त्याबाबत ग्रामस्थांकडून वांरवार निवेदन प्राप्त होत होते. त्यामूळे हे कामे पुर्ण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने माझे सातत्याने प्रयत्न सुरु होते. अखेर या भागातील सिमेंट काॅंक्रिट रोडसाठी ग्रामविकास निधी अंतर्गत 100 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करता आला. त्यामूळे आज या कामांचे भूमिपूजन करतांना ग्रामस्थांची जुनी मागणी सोडविता आल्याचे सामाधान वाटल असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. कोरोना बाधितांची सख्या कमी होत असली तरी कोरोना पूर्णताह गेलेला नाही. त्यामूळे ग्रामीण भागात कारोनाचा शिरकाव होणार नाही या दिशेने ग्रामपंचायतीने नियोजन करावे यासाठी निधीची गरज भासल्यास तो मी उपलब्ध करुन देणार अशी ग्याहीही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

100 लक्ष रुपये खर्च करुन येथे हे विकास कामे होत आहे. याचा अर्थ येथील सर्व प्रलंबीत कामे झाले असा नाही. येथील आणखी काही कामे येत्या काळात मला करायची असल्याचेही ते यावेळी म्हणाले. प्रथमच इतका मोठा निधी उपलब्ध झाला असल्याची भावणा या प्रसंगी ग्रामस्थांनी बोलून दाखवली. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.