ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर 150 बोरी मोहा सडवा जप्त

0
251

नागभीड : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात हुमा या गावच्या तलावजवळील नाल्यात चार ठिकाणी लपवून ठेवलेल्या मोहा सडव्याच्या 150 बोरी जप्त करून त्यातील सडवा नष्ट करण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत चार संशयितांची नावे समोर आलेली आहेत. त्यात अतुल जयसिंग सयाम, दिवाकर उरकुडा देशमुख,मनोज नामदेव तोरे, मुखरू बाबुराव सयाम रा.सर्व हुमा यांचा समावेश आहे.
या कारवाहित ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात ए.पी.आय. कोरवते,पि.एस.आय. सतीश सोनेकर,पो.ह.सावसाकडे,सोनवणे,शेडमाके,मूल्यमवार यांनी संयुक्तरित्या कारवाही केली.

येन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नागभीड पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे नागभीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.