शहीद क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या संघर्षाचे योगदान समाजाच्या सर्दैव स्मरणात राहावे – आ. किशोर जोरगेवार

0
14

चंद्रपूर : ब्रिटिश  शासनाविरोधात स्वातंत्र संग्रामाची ज्योत पेटविणा-या शहिद क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या संघर्षाचे योगदान समाजाच्या सर्दैव स्मरणात राहावे असे भावोद्गार आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रीय योद्धा क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जयंती निमित्य त्यांना अभिवादन करतांना काढले. शहिद बाबूराव शेडमाके यांच्या जयंती निमित्य  जिल्हा कारागृहातील शाहिद  स्मारकास आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाप्रमूख जितेश कुळमेथे, प्रदिप गेडाम, वैशाली मेश्राम, नितेश बोरकुटे, विक्की पेंदाम, संगीता येरमे, लता पोरेते, प्रिती मडावी, अनू चांदेकर, सोनू कुमरे आदिंची उपस्थिती होती.