पहिल्याच पावसात कोठारी मार्गातील पूल वाहून गेला

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील कोठारी ते तोहोगाव मार्गातील पाचगाव जवळील भलभली नाल्यावर नाविन पुलाचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे बाजूने पोच मार्ग काढून तात्पुरते वळण रस्ता करण्यात आला.

परंतु पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याच्या वेगाचा अंदाजानुसार कच्चा पूल केला नसल्याने पहिल्याच पावसात पूल वाहून गेला तसेच हा कच्चा रस्ता करीत असताना मुरूम गिट्टी सुद्धा टाकण्यात आले नाही यासाठी अंदाजपत्रकात तरतुदही असते त्यामुळे कोठारी ते तोहोगाव मार्ग बंद झाला आहे.

संबंधित विभागाचे अभियंता व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षित आणि बेजबाबदार पणात कच्चा पूल वाहून गेला त्यामुळे नाहकपणे या मार्गातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.