सुरज बहुरीया हत्याकांडातील आरोपी आकाश अंधेवार यांच्यावर गोळीबार
चंद्रपूर : बल्लारपूर येथील बहुचर्चित सुरज बहुरीया हत्याकांडातील आरोपी आकाश अंधेवार यांच्यावर सूड उगविण्याच्या उद्देशाने महिलेच्या रुपात आलेल्या युवकाने भरदिवसा गोळीबार करून खळबळ माजवून दिली. चंद्रपूर शहराने आज सोमवारी (12 जुलै) ला भर दिवसा गोळीबाराचा थरार अनुभवला असुन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमधे एका बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार करून एका व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आकाश अंधेवार कसे जखमीचे नाव असून आरोप अज्ञात असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या हॉटेल मध्ये आज्ञात बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार केला.ह्यात बल्लारपूर निवासी आकाश अंधेवार जखमी झाला आहे, जखमीला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. या घटनेला सुरज बहुरिया हत्याकांडाची किनार असल्याचे बोलले जात आहे. बल्लारपूर येथील सूरज बहुरीया हत्त्या कांड मधील आकाश अंधेवार हा आरोपी आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बहादुरे यांनी व घटनास्थळी येवून कारवाई सुरू केली आहे. वृत्त लिहीपर्यंत आरोपीचा शोध लागलेला नव्हता.
गोळीबार झालेल्या ठिकाणी आमदार जोरगेवार यांची भेट
चंद्रपूर शहर हे नेहमी शांतीप्रीय राहिली आहे. मात्र बल्लारपूरातील गुन्हेगांकडून येथील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे खपवून घेणार नाही असा ईशारा देत बल्लारपूरातील दादागीरी ठेचून काढा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहे.
बल्लारपूरातील आकाश अंधेवार याच्यावर चंद्रपूरातील रघुवंशी काॅम्पलेक्स येथे गोळ्या झाडण्यात आल्यात. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर ठिकाण गाठत पोलिसांशी चर्चा केली. तसेच या प्रकारानंतर दहशतीत असलेल्या येथील व्यापा-यांशीही चर्चा केली.