आठ वर्षीय चिमुकलीला ‘चल तुला माझे घर दाखवितो,’असे म्हणत तिला घरी नेले आणि…

चंद्रपूर : आपल्या देशात लहान मुलींना देवी म्हणून पूजल्या जाण्याची पवित्र परंपरा असतांना काही विकृत मानसिकतेचे नराधम हे माणुसकीला काळिमा फासण्याचे काम करीत असतात समाजमन हेलावणारी अशीच एक घटना भद्रावती येथे घडली.

अशोक नथुजी वनकर रा.डोलारा तलाव भद्रावती असे आरोपीचे नाव आहे. आठ वर्षीय पीडित मुलगी ही आपल्या आजीकडे दीड महिन्यापूर्वी आली होती. तेव्हा ती शेजारी खुल्या जागेवरील झुल्यावर बसली असता, आरोपीने ‘चल तुला माझे घर दाखवितो,’ असे म्हणत तिला घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला.

याबाबत कुणाला सांगशील, तर जीवानिशी ठार मारील, असा दम दिला होता. त्यामुळे पीडित मुलीने ही घटना घरच्यांपासून दीड महिना लपवून ठेवली. तिची प्रकृती वारंवार बिघडत असल्याचे पाहून तिच्या आजीने व आत्याने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, ही संपूर्ण घटना तिने सांगितली. या घटनेची तक्रार रविवारी पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी आरोपीला अटक केली.