पोलिस प्रशासन आणि आरोपीच्या विरोधात आक्रोश कँडल मार्च

0
588
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• शुभम फुटाणे हत्या प्रकरण

• आरोपीला फाशीची शिक्षा द्या : नागरिकांची मागणी

चंद्रपूर : घुग्घूस वेकोलि रामनगर वसाहत निवासी इंजिनियरींगचा विद्यार्थी शुभम दिलीप फुटाणे (25) हत्या प्रकरणात तपासात विलंब केल्याने पोलिस प्रशासन विरोधात व आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी याकरिता आज रविवारी 14 फेब्रुवारी 2021 ला सायंकाळी सहाच्या सुमारास आक्रोश कँडल मार्च काढण्यात आला. मार्च मध्ये घुग्घूसवासीय सहभागी झाले. पोलिस प्रशासन मुर्दाबाद आणि आरोपीला फाशीस शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करीत शुभम फुटाणे याचे घरापासून मार्च निघाला असून गांधी चौकात मार्चचा समारोप करण्यात आला.

तब्ब्ल महिनाभरानंतर काल शनिवारी शुभम फुटाणे हत्या प्रकरण उघडकीस आला असून यात गणेश पिंपळशेंडे आरोपीला अटक करण्यात आलली आहे. 30 लाखाच्या खंडणीसाठी शुभमचे अपहरण करण्यात आले. खंडणी न मिळाल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आपण एकट्याने हत्या केल्याचे त्याचे म्हणने आहे. सदर आरोपीने सात वर्षीय बालकाला ही अशाच प्रकारे अपहरण करून पळविण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु समयसुचकतेने त्याला वाचविण्यात पोलिस प्रशासनाला यश आले होते. तसेच यापुर्वी अपहरणाच्या घटना येथे घडतच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या अकार्यक्षतेमुळे गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकात रोष वाढत आहे.

महिनाभरात पोलिस प्रशासनाला फारसे सुगावे न लागल्याने शुभम ला वाचविता आले नाही. त्याच्या मृतदेहाच्या थोड्याफार अस्थीच पोलिसांच्या हाती लागल्या. महिनाभर पोलिस प्रशासनाने शुभम फुटाणे या विद्यार्थ्याच्या शोधार्थ फारसे प्रयत्न केले नाही असा आरोपी नागरिकांनी करून आज सायंकाळी पोलिस प्रशासनाच्याविरोधात आणि आरोपीच्या विरोधात आक्रोश कँडल मार्च काढून निषेध व्यक्त् केला. आरोपीला फासीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. कँडल मार्च द्वारे शुभम फुटाणे ह्याला श्रध्दांजली वाहून त्याच्या आत्म्याला शांती मिळो असी प्रार्थनाही कँडल मार्च मध्ये सहभागीग नागरिकांनी केली.