चंद्रपूर : वेकोलीत रिक्त असलेल्या माईनिंग सरदार पदाच्या जागा भरण्यात याव्हात याकरीता आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. दरम्याण आज त्यांनी वेकोलीच्या नागपूर सि.एम.डी कार्यालयात सि.एम.डी मनोज कुमार यांच्यासह संबधित अधिका-यांशी चर्चा करत पून्हा एकदा ही मागणी लावून धरली. यावेळी सि.एम.डी मनोज कुमार यांनी माईनिंग सरदार पदाच्या 210 जागा भरणार असून लवकरच या संदर्भातील जाहिरात प्रसिध्द करणार असल्याचे सांगीतले आहे. तसेच स्टाॅप नर्सच्या 56 जागांसाठी परिक्षा घेणार असल्याचे आश्वासनही सि.एम.डी मनोज कुमार यांनी यावेळी दिले आहे. या बैठकीला रेवतकर, मधूरम, गोस्वामी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे प्रेम गंगाधरे यांची उपस्थिती होती.
नागपूर वेकोली विभागात अनेक कोळशाच्या खाणी असुन सुद्धा या ठिकाणी अपेक्षित असा रोजगार स्थानिक युवकांना उपलब्ध झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक कोळश्याच्या खाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे इथे काम करणार्या युवकांचा रोजगार बुडाला आहे. अश्यातच वेकोली प्रशासनाकडून २०१८ पासून माईनिंगमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी माईनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक अद्यापही नौकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये त्यांची वयोमर्यादा वाढत चालली आहे. उत्तीर्ण असून सूध्दा भरती प्रक्रिये अभावी नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे.
त्यामूळे या विरोधात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने नागपूर येथील वेकोलिच्या सि.एम.डी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानंतर आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलीचे सि.एम.डी मनोज कुमार यांच्यासोबत चर्चा करत पून्हा एकदा सदर मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर वेकोलीचे सिएमडी मनोज कुमार यांनी माईनिंग सरदारच्या 210 रिक्त जागा भरण्याचे मान्य केले असून लवकरच या बाबतची जाहिरात वेकोली प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच बरोबर स्टाॅप नर्सच्या 56 जागांसाठी परिक्षा घेणार असल्याचेही सि.एम.डी मनोज कुमार यांनी या बैठकीत म्हटले आहे. त्यामूळे आता माईनिंग प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांना वेकोलीत नौकरीची संधी प्रदान होणार आहे.