• ओबीसींच्या वर्तमान व ज्वलंत विषयांवर चर्चा करुन आंदोलनाची ठरेल दिशा
• १५ जून २०२१ रोज मंगळवारला वेळ साय. ६ ते ९ वाजेपर्यंत
चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची झुम मीटींग राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ जून २०२१ रोज मंगळवारला वेळ साय. ६ ते ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत ओबीसींच्या वर्तमान व ज्वलंत अशा विविध विषयांवर चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करणे, दिनांक 4 मार्च 2021 ला सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयावर विचार विनिमय करणे, क्रिमीलयेरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने येणाऱ्या अडचणी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळण्याबाबत, आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण, ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा, ओबीसींचा बॅक लॉक त्वरित भरण्यात यावा, रोहिणी आयोग रद्द करून नवीन आयोग तयार करावा, आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या ऑनलाईन झुम मीटींग मधे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, सुभाष घाटे, कल्पना मानकर, श्याम लेडे, चेतन शिंदे, प्रकाश भागरथ, रोशन कुंभलकर यांनी केले आहे.