मंगळवारी गॅस गळतीने झाला होता मृत्यू
चंद्रपूर : शहरालगतच्या दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे झालेल्या मृत्यू नंतर काल मंगळवारी सायंकाळी (13 जुलै) ला महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत सहा मृत्तांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. तर त्या कुटूंबातील जिवंत असलेल्या एकमेव महिला सदस्य दासू रमेश लष्कर यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
सोमवारी वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे दुर्गापूर भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे घराच्या आत असलेले जनरेटर लावून हे कुटुंब झोपले होते. सूरू असलेल्या जनरेटरमधून गॅस गळती झाली. त्यात अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) , दासू रमेश लष्कर(४०)आदी सहाही जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना उघडकीस आली. तर महिला सदस्य दासू रमेश लष्कर ह्या जिवंत होत्या. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान दुपारी सहाही जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंंकाळी सहाच्या सुमारास सहाही मृतदेहांना दफणविधी करण्यात आली. यावेळी महसुल प्रशासनाचे तहसीलदार सचिन खंडारे , पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची भेट
घरी सुरू असलेल्या जनरेटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे सहा जणांचा मृत्यू झालेल्या घटनास्थळाला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी काल मंगळवारी भेट दिली दुपारी सायंकाळी दुर्गापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले त्यावेळी यांनी उपस्थिती दर्शविली मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.