बिबट्याने झोपलेल्या महिलेला घरातून नेले फरफटत ; काही अंतरावर महिलेचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

व्याहाड बुज येथील गावातच घडली थरकाप उडविणारी घटना

चंद्रपुर : सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे काल मंगळवारच्या रात्री (13 जुलै) ला साडेदहाच्या सुमारास बिबट्याने घरात झोपून असलेल्या महिलेला नरडीला पकडून घराबाहेर फरफटत ओढत नेवून ठार केल्याची थरकाप उडविणारी घटना घडली. गंगुबाई रामदास गेडाम ( 61) असे मृत महिलेचे नाव आहे. दिवसेंदिवस तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असून मानवास धोका निर्माण झालेला आहे. वन्य प्राणी आणि मानवांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

वनपरिक्षेत्र सावली, उपक्षेत्र व्याहाड येथील नियत क्षेत्र सामदा अंतर्गत येत असलेल्या व्याहाड बूज येथे काल मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गंगुबाई रामदास गेडाम हिचे पती हे जेवनासाठी बाहेर गेले होते त्यामुळे ती घरी जेवनानंतर महिला आपल्या घरी छप्परात झोपी गेली होती. याच परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधत महिलेच्या नरडीला पकडून फरफटत 30 फुट लगतच्या एका घराशेजारी ओढून बाहेर नेले. दरम्यान शेजारी हा बाथरूम साठी उठला असता सदर महिलेचा मृतदेह पडून होता आणि बिबट्या पळताना दिसून आला. सदर घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. प्रचंड आरडाआओरड होताच बिबट्याने गावातून पळ काढला.

घराच्या बाहेर पडून असलेल्या ठिकाणी तिची पहाणी केली असता तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीकरिता सावलीचे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या थरकाप उडविणा-या घटनेमुळे गावात प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिक भयभीत झालेले आहेत. सदर मृत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे घटनेच्या वेळी पती बाहेर होता तर मुलगा हा बाहेर राहतो. मुलगी ही विवाहीत आहे. वनविभागाने मृत महिलेच्या कुटूंबाला तातडीने 25 हजाराची मदत केली आहे.
वन्यप्राणी जंगलात आणि शेतशिवारात येवून पाळीव प्राणी आणि शेतक-यांचा बळी घेत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता हिंस्र प्राणी गावात घरात येवून मानवालाच उचलून नेत असल्याने वन्य प्राणी आणी मानवात संघर्ष वाढत आहे.