शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांवर वाघाचा हल्ला ; तीन शेत मजूर जखमी

0
10

यवतमाळ : जिल्ह्यातील अती दुर्गम परिसरातील झरी तालुक्यातील वाढोणा बंदी येथे वाघाने तीन शेतात काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केल्याची घटना आज सोमवारी घडली. पैंकू मडावी, अजय आत्राम आणि प्रकाश आत्राम कसे जखमींचे नाव असून त्यांना पांढरकवडा येर्थील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे . दरम्यान सर्वांची प्रकुती स्थिर आहे.

झरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. याच परिसरातील चिंचघाट येतील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर हल्ला केला आहे. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत असून. नागरिकांनी या वाघाचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील जनतेनी वनविभागाकडे मागणी केली आहे.