महसूल विभागाने जप्त केलेले घुग्घुस येथील रेतीचे ट्रॅक्टर सोडावे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पत्रपरिषदेतून ट्रॅक्टर मालकांची मागणी

घुग्घुस : येथील ट्रॅक्टर मालकांनी सोमवारला दुपारी 4 वाजता दरम्यान पत्रपरिषद घेऊन चंद्रपूर महसूल विभागाने जप्त केलेले रेतीचे ट्रॅक्टर सोडून देण्याची मागणी केली आहे.

काही महिन्यापूर्वी महसूल विभाग व पोलीस विभागाने घुग्घुस येथील वर्धा नदीच्या रेती घाटावर धाड टाकून 24 रेतीचे ट्रॅक्टर जप्त केले. काही ट्रॅक्टर मालकांनी आपले ट्रॅक्टर सोडविण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये दंड भरला परंतु महसूल विभागाने त्यांचे ट्रॅक्टर दंड वसुल करून सुद्धा सोडले नाही. तर काही ट्रॅक्टर मालक दंड भरण्यास तयार आहे परंतु दंड भरून सुद्धा ट्रॅक्टर सुटत नसल्याने ते दंड भरण्यास तयार नाही आहे.

तीन वर्षापासून वर्धा नदीच्या रेती घाटाचा लिलाव झाला नाही या रेती घाटाचा लिलाव शासनाने करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. कोरोना महामारी मुळे ट्रॅक्टर मालक, चालक व कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जप्त केलेले ट्रॅक्टर महसूल विभागाने सोडून द्यावे अशी मागणी ट्रॅक्टर मालकांनी पत्रपरिषदेतून केली आहे.

पत्रपरिषदेत मुन्ना जुल्फेकार अहमद, विलास रामटेके, हितेश लोढे, मनोज सरोज, खलील अहमद, नत्थू घोडके, पिंटू लोढे, नभी शेख, मोसीम खान, आनंद मिश्रा, शम्मूद्दीन शेख, प्रल्हाद घोडके, अशोक घोडके, अंकुश ठाकरे व मालक, चालक व कामगार उपस्थित होते.