Breaking : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

उद्या दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

निकालाची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज ट्विट करीत दिली. यावर्षी प्रथमच करोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. जवळपास 16 लाख 58 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे उद्या दुपारपर्यंत निकाल जाहीर होतील.

 

निकाल कोणत्या संकेतस्थळावर जाहीर होतील, त्याची माहिती सायंकाळपर्यंत प्रसिद्ध होतील. या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे. करोनामुळे दहावी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर मूल्यमापनच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कसा जाहीर होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.