चंद्रपुरात पत्रकारही आता सुरक्षित नाही…

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

‘अगर हमारा व्हिडीओ व्हायरल हुआ तो तुझे काट डालेंगे’ ची दिली धमकी

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी उठली आणि गुन्हेगारी वाढली अस म्हणायला आता वावगं ठरणार नाही.
जुन्या वादात चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये भरदिवसा एका युवकावर गोळीबार करण्यात आला, युवक बचावला असला तरी शहरात संघटित गुन्हेगारी मध्ये आता वाढ होत आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी आता वेळेत अश्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यात आला नाही तर ही गुन्हेगारी अनियंत्रित एक दिवस जरूर होणार.

14 जुलै ला भर दुपारी वरोरा नाका चौकात 10 ते 15 युवकांनी एकाला बेदम मारहाण केली, युवकाला मारहाण होत असताना नागरिक जमले मात्र कुणीही त्या भांडणाला सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. वरोरा नाका चौकात श्रमिक पत्रकार संघाचे कार्यालय आहे त्यासमोर उभे असलेल्या ANI चे जिल्हा वार्ताहर प्रकाश हांडे यांनी मारहाणीच्या दृश्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला मात्र मारहाण करीत असलेले युवकांची नजर हांडे यांच्यावर पडली.

आणि त्या युवकांचा घोळका पत्रकाराकडे वळला.
“अगर हमारा व्हिडीओ कल व्हायरल हुआ तो तुझे काट डालेंगे” अशी धमकी देत त्यांचा हातात असलेला मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. झटापट वाढत असताना काहींनी मध्यस्ती केली व लगेच रामनगर पोलिसांना फोन करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी यायला बराच विलंब लावला. त्या युवकाला मारहाण केल्यावर सुद्धा 10 ते 15 मिनिटं ते युवक वरोरा नाका चौकात थांबले मात्र पोलीस काही आले नाही.
सर्व युवक पसार झाल्यावर पोलीस आले, परंतु त्यांना कुणीही घटनास्थळी मिळाला नाही.

पत्रकार प्रकाश हांडे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत रितसर तक्रार केली आहे. सायंकाळच्या सुमारास ते सर्व आरोपी युवक पुन्हा वरोरा नाका चौकात जमा झाले होते त्यावेळी सुद्धा पोलिसांना फोन करण्यात आला मात्र यावेळी पोलीस आलेच नाही. गोळीबार च्या घटनेनंतर आता हल्ला करणारे युवक सजग झाले आहे, मारहाण करणारे आरोपीनी काही युवक नागरिकांच्या मध्ये कुणीही व्हिडिओ किंवा फोटो न काढावे यासाठी उभे केले होते.

पोलिसांच्या विलंबाने आज युवकाचा बळी गेला असता जर वेळीच मारहाण करणाऱ्या युवकांचा घोळका पत्रकारांच्या दिशेने गेला नसता. शहरातील गुन्हेगारीवर आता पोलिसांनी कठोरतेने वागून संपूर्ण दादागिरी ठेचायला हवी नाहीतर चंद्रपूर कधी गॅंग ऑफ वासेपुर होणार याला वेळ लागणार नाही.