आजपासून ताडोबाची ऑनलाईन बुकिंग सुरू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून ताडोबा पर्यटनाची ऑनलाईन बुकिंग सुरू करण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला आहे.

बफर झोनमधील पर्यटन १६ ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. सफरीसाठी सकाळी ६ ते १० वाजता आणि दुपारी २. ३० ते सायंकाळी ६. ३० पर्यंत वेळ ठरविण्यात आली आहे. सर्व सफारीचे आरक्षण ऑनलाईन पद्धतीनेच करावे लागणार असून, त्यासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.