आत्महत्या पूर्वी लिहिली चिठ्ठी
चंद्रपूर : आज शुक्रवार 16 जुलै रोजी सकाळी 7:30 वाजता दरम्यान संतोष तुळशीराम चुने (26) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. चंद्रपूर-घुग्घुस मुख्य मार्गांवर त्यांचे लेडी शॉपचे दुकान आहे त्या दुकानातच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
सकाळी ही माहिती मिळताच भाजपचे विवेक बोढे, अमोल थेरे, शरद गेडाम, बबलू सातपुते, गणेश खुटेमाटे, कोमल ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनास्थळी पोहचण्यास घुग्घुस पोलिसांनी उशीर केल्याने जमलेल्या नागरिकांनी रोष व्यक्त केला.
सहा.पो.नि.संजय सिंग, महेश मांढरे, सचिन बोरकर, अशोक आसुटकर, मंगेश निरंजने, निलेश तुमसरे, प्रकाश करमे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शवविच्छेदणासाठी चंद्रपूर येथे मृतदेह पाठविला आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.