सोशल मीडियावर मुलीची बदनामी करणाऱ्या युवकाला मध्यप्रदेशातून अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील रहिवासी असलेल्या एका कुटुंबाने आपल्या मुलीचे लग्न केले नाही, म्हणून गेल्या 15 वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीची बदनामी करणाऱ्या विवाहित युवकाला बल्लारपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या झांसी येथून अटक करत त्याला न्यायालयात हजर केले.

कोर्टाने आरोपीला जामिनावर सोडले अशी माहिती मिळाली आहे. पीडितेच्या आईने बल्लारपूर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत सांगितले कि २००७ मध्ये उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील मौरानीपूर येथे राहणारा सुरेन्द्र प्रतापसिंग रघुवीरसिंग परिहार वय ४५ याचा संबंध आपल्या मुलीसाठी आला होता. परंतु त्याच्या खराब आचरणामुळे आणि व्यसनाधीनतेमुळे त्यांनी हे संबंध नाकारले होते. यानंतर, फेब्रुवारी २०० ९ मध्ये मुलीचे मुंबईतील एका तरूणाशी लग्न झाले, तिला एक मूल आहे. पण हे संबंध नाकारल्यानंतर सुरेंद्र प्रताप सिंह संतापला होता आणि त्याने फोनवर मुलीला त्रास देणे सुरू केले. २०१५ पासून त्याने बनावट अकाउंट बनवून मुलीची बदनामी सुरू केली. ज्याची खबर मुलीने मुंबई सायबर सेलला दिली होती. तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली व नंतर जामिनावर सोडले. हे प्रकरण अद्याप मुंबई न्यालयात प्रलंबित आहे.

या घटनेनंतर सुरेंद्र काही दिवस ठीक होता, परंतु डिसेंबर २०१८ पासून फेसबुकच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूर मधील लोकांना मित्र बनवून अपमानास्पद, खोटी विधाने करण्यास सुरूवात केली. यामुळे निराश होऊन ५ सप्टेंबर २०१९ रोजी बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र कोरोनामुळे त्याला अटक होऊ शकली नव्हती. कोरोनाची लाट कमकुवत झाल्यावर बल्लारपूरचे ठाणेदार उमेश पाटील, पीएसआय अनिल चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतोडे यांनी आरोपीला 2 जुलै रोजी अटक केली व त्याला न्यायालयात हजर केले. तेथून कोर्टाने त्याला जामिनावर सोडले आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.