पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांची एसीसी कंपनीला भेट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कामगारांच्या समस्या घेतल्या जाणून वेतनवाढीने कामगारांन मध्ये उत्साहाचे वातावरण

चंद्रपूर : राज्यातील सिमेंट कंपनीत ठेकेदारी तत्वावर कार्यरत कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात यावी ही मागणी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी केली असता त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून सिमेंट उद्योगाचे किमान वेतन हे एकवीस हजार रुपये इतके करण्यात आले.

यामुळे कामगारांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले एसीसी कंपनीतील कामगारांच्या समस्यां सोडवण्यासाठी आज सकाळी साडे अकरा वाजता एसीसी कंपनीत पालकमंत्री यांनी भेट दिली व व्यवस्थापकाशी प्लांट हेड अनिल गुप्ता, हच आर हेड पुष्कर चौधरी,सि.एस.आर हेड विजय खटी यांच्याशी चर्चा करून कामगारांच्या समस्या तातळीने सोडवण्याचे आदेश दिले.

याप्रसंगी जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश जी देवतळे,घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.