चंद्रपूर : घुग्घुस नगरपरिषदेच्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित मागणीचा मार्ग मोकळा करून घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून दिल्या नंतर प्रथमच घुग्घुस येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी आलेल्या राज्याचे बहुजन विकास, आपत्ती निवारण, मदद व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य स्वागत केले.
पालकमंत्री विजय वड्डेटीवार, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेजी यांच्या हस्ते रिबन कापून घुग्घुस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
पालकमंत्री यांनी कार्यालयात आलेल्या नागरिकांचे समस्या ऐकून घेतल्या तसेच नागरिकांचे निवेदनाचा स्वीकार केला.
याप्रसंगी किसान काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,महिला शहर अध्यक्ष विजया बंडीवार, कामगार नेते सैय्यद अनवर,प्रफुल हिकरे, शेखर तंगडपल्ली, सिनू गुडला, विजय माटला, जावेद कुरेशी, इर्शाद कुरेशी, शहजाद शेख, बालकिशन कूळसंगे,नुरुल सिद्दिकी, विशाल मादर, रोशन दंतलवार, सचिन कोंडावार, सुनील पाटील, रंजित राखूनडे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.