चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार हे घुग्घुस भेटीवर आले असता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला सदिच्छा भेट देऊन येथील विकास कामाचा आढावा घेतला.
घुग्घुस येथील बाबासाहेबांच्या स्मारकाला विदर्भातील सर्वात सुंदर असे स्मारक बनविण्याचे उपस्थितांना वचन दिले व या स्मारकाच्या विकासासाठी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब बहुउद्देशीय स्मारक समितीचे रामचंद्र चंदनखेडे, अशोक (बंडू रामटेके),काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते