• वाघाचे अवयव मिळाले शाबूत
चंद्रपुर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तामसी बेटात घोसरी गावाजवळ एका दीड वर्षीय वाघाचा आज वन विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना आढळून आला आहे अगदी कमी वयाचा वयाच्या वाघाचा मृत्यू झाल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे पर्यंत वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.
आज सोमवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तामसी बिटात घोसरी वन विभागाच्या कर्मचारी गस्त घालत असताना घोसरी गावालगत तलावाजवळ दीड वर्षीय वाघाचा मृतदेह आढळून आला.
सदर मृतदेह टिटिसी सेंटर ला नेण्यात आला आहे. उद्या 20 जुलै ला सकाळी शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर वाघाचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला याची माहिती समोर येणार आहे, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे.
मृत वाघ नर असून त्याचं वय अंदाजे 2 वर्ष आहे. वाघाचा मृत्यू 2 दिवस आधी झाल्याची शक्यता असून त्याचे सर्व अवयव शाबूत आहे.