चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर

0
475
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात दारू बंदी करण्यात आली आहे. तरीही तालुक्यातील अनेक ठिकाणी दारूचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचे वारंवार समोर येत आहे. यासाठी कोणत्या बड्या नेत्याचे आणि अधिकाऱ्यांचे आशीर्वाद लाभले आहे का? अशी चर्चा सुरु असताना काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे च्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आली होती. मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने कारवाई केली होती.

थेट पालकमंत्री यांच्या विधानसभा क्षेत्रातील कांग्रेस नगरसेवक हा दारू तस्करीच्या गंभीर गुन्ह्यात अडकला होता, आता पुन्हा पालकमंत्री यांच्या पूर्वीच्या विधानसभा क्षेत्रात म्हणजेच चिमूर येथील विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष गौतम पाटील रा. वहाणगाव हे अवैध दारू तस्करी प्रकरणात फरार झाले आहे.
चिमूर तालुक्यातील पळसगाव, पिंपर्डा परिसरात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता 19 मार्चला सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी विलास निमगडे, सचिन गजभिये, सचिन खामनकर यांचेसह सापळा रचला असता सायंकाळी 4.30 वाजेदरम्यान स्कॉर्पिओ वाहन चालकाने अमराई भडका नाल्यामध्ये वाहनातील दारूच्या पेट्या टाकून पळून गेला.

पोलिसांनी देशी दारू किंमत 1 लाख 46 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मात्र आरोपी गौतम पाटील फरार झाले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चिमूर पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.