बिबट्या घरात घुसून महिलेवर हल्ला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

सावली तालुक्यातील वाघोली गावातील घटना

चंद्रपुर : पहाटेच्या सुमारास साखरझोपेत असलेल्या एका महिलेवर बिबट्याने घरात बसून हल्ला केल्याची घटना आज सोमवारी (20 जुलै) ला पहाटेच्या सुमारास वाघोली गावात घडली. यात महिला जखमी झाली असून गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तुळसाबाई म्हशाखेत्री असे एकही महिलेचे नाव आहे. काही दिवसापूर्वी याच परिसरात बिबट्याने घरात घुसून एका महिन्याला पंचवीस फूट फरफटत नेले. त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना परत बिबट्याचा हल्ला झालेला आहे.

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील सामदा बिटातील वाघोली गावात आज बिबट्याने पुन्हा पहाटेस थरार करीत घरात खाटेवर असलेल्या तुळसाबाई म्हशाखेत्री या महिलेच्या घरात जाऊन तिच्यावर हल्ला करीत तिला बाहेर खेचले व गंभीर जखमी केले. तिला फरफटतनेत असल्याचा आवाज आल्याने घराशेजारी उठले आणि पाहिले असता बिबट्या घराबाहेर पडत असल्याचे दिसले. महिलेवर हल्ला करण्यापूर्वी बिबट ने 2 कोंबड्या वर ताव मारला. सदर घटनेची चाहूल लागताच परिसरातील नागरिक जमा होऊन बिबटचा शोध लावण्याचा प्रयत्न केला असता बिबट पसार झालेला होता.

सदरया घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली तसेच जखमी महिलेला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी व्याहड बूज येथे महिलेला घरातून उचलून बाहेर नेऊन ठार केले होते अगदी ताजी असताना आज वाघोली येथे पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घरात घुसून नागरिकांचे जिव घेणा-या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनीकेली आहे.