शासकीय निधितुन निर्मित प्रयास सभागृह नगरपरिषदेच्या ताब्यात द्यावे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस काँग्रेस तर्फे पालकमंत्र्याना निवेदनातुन मागणी

घुग्घुस : खासदार, आमदार, खनिज निधी सह अन्य शासकीय निधीतुन वॉर्ड क्रं. सहा येथे भव्य असे प्रयास सभागृह निर्माण करण्यात आला आहे.

मात्र शासकीय निधींतून निर्माण करण्यात आलेला हा सभागृह एका राजकिय पक्षाच्या ताब्यात असून त्याठिकाणी त्यांचे राजकीय कार्यक्रम पडतात त्यांचा लाभ फक्त त्यांच्या मर्जीतले लोकांनाच मिळत आहे.

या शासकीय निधींतुन निर्माण झालेल्या प्रयास सभागृहाचा उपयोग गावातील नागरिकांना लग्न, बारसे यासह अन्य मांगलिक कार्यासाठी झाला पाहिजे याकरिता सदर सभागृह नगरपरिषदच्या ताब्यात देण्याची मागणी काँग्रेस कमेटी तर्फे पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांना करण्यात आलेली आहे. सदर निवेदन शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्यातर्फे करण्यात आली.