सरपणासाठी जंगलात नेऊन पत्नीची केली हत्या ; आरोपी पती झाला फरार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : सरपणासाठी पत्नीला जंगलात नेऊन पतीनेच हत्या केल्याची खळबळजनक घटना चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथे उघडकीस आली आहे. शालू बबलू शिंदेवार (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती बबलू शिंदेवार हा फरार झालेला आहे.
आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास
सरपण आणण्यासाठी पती बबलू शिंदेवार यांनी पत्नी शालुला जांभुळघाट गावाला लागून असलेल्या जंगलात नेले आणि त्याठिकाणी पत्नी शालुची हत्या केली.
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथे जंगम नागरिकांची जंगमपूरी वस्हत वसलेली आहे. गावोगावी फिरुन भांडे विकने व उदरनिर्वाह करणे हा जंगम नागरिकांचा लघु व्यवसाय आहे

.आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान बबलू शिंदेवार हे पत्नी शालु सोबत सरपनासाठी जंगम वस्तीला लागून असलेल्या जंगलात गेले होते. सरपनासाठी गेल्यावर जंगलात पती-पत्नीत नेमके काय झाले याची कल्पना कुणालाच नाही. मात्रपती बबलू शिंदेवार याने पत्नीला जबर मारहाण करून जागीच ठार केले व झुडपात झाकून ठेवले.

घरी आल्यानंतर पती बबलू शिंदेवार हा जांभूळघाट गावात आला व त्याच्या जवळील नागरिकांना पत्नी शालुचा खून केला असल्याची माहिती दिली. ही माहिती सर्वत्र गावात पसरली. सदर चर्चेवरून भिसी पोलिस स्टेशनला खुन प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार मनोज गभणे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणी साठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

आरोपी बबलू शिंदेवार हा फरार झाला असून भिसी पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.आरोपी बबलू शिंदेवार पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर खुनाच्या घटनेचा सत्य पुढे येईल.