घुग्घुस : वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशी मध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व विशेष असून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणून संबोधले जातात पंढरीच्या विठ्ठल – रुखमणीचे संपूर्ण महाराष्ट्रात भाविक – भक्तांतर्फे पूजा केली जाते.
सध्या कोरोना काळात पंढरपूरची वारी बंद असल्याने भाविकांनी गावो – गावी पांडुरंगाची पूजा केली घुग्घुस येथील तुकडोजी नगर येथील महिलांनतर्फे विठ्ठल – रुखमाईची पालखी काढण्यात आली.
यापालखीची विधिवत पूजा राजुरेड्डी यांच्यातर्फे करण्यात आली पालखीचे आयोजन पुष्पां नक्षीने,माधुरी ठाकरे,लीलाबाई गौरकार,रत्नमाला गोहोकार,नीता वाढरे,वर्षा वडसकर,सविता गोहोकार,शुभांगी नांदे,विमला ठाकरे,चैताली ठाकरे,सरस्वती कोवे,बंटी बाई नागपुरे यांनी केले असून बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.