सायकल भ्रमंतीने “प्रदुषणमुक्त” भारतासाठी साकडे

0
86

• 26 दिवसांत 4 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास
• सायकलस्वार नामदेव राऊत यांचा चंद्रपुरात सत्कार

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेत अतिक्रमण विभागातून सेवानिवृत्त झालेले आणि क्रीडा प्रशिक्षक, स्विमर असलेले नामदेव राऊत स्वच्छ भारत अभियान, व प्रदुषणमुक्त व पर्यावरण संरक्षणचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकल भ्रमंतीद्वारे 26 दिवसात सुमारे 4 हजार किलो मिटरचा प्रवास पार केला आहे. हा प्रवास विविध केला असून प्रदुषण मुक्त पर्यावरणासाठी त्यांनी सायकलद्वारे भ्रमंती करून नागरिकांना साकडे घातले आहे. राऊत यांच्या सामाजिक उपक्रमाची चर्चा पंचक्रोशीत सुरू झाली आहे. नुकतेच ते चंद्रपुरात परतले असून आज सोमवारी त्यांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार पार पडला. त्यांच्यासमवेत रविंद्र तरारे, संदिप वैद्य, श्रीकांत उके, श्रीकांत रेड्डी, प्रसाद देशपांडे यांचा समावेश होता.

राऊत यांनी गुजरात येथील द्वारका येथून सायकल प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर द्वारका, जामनगर, चित्रोड, पाटण, राजस्थान, माउंट अबू, उदयपुर, अजमेर, जयपूर, दौसा, उत्तरप्रदेश, आग्रा, सौरिख, लखनऊ, अयोध्या, बस्ती, बिहार, गोपालगंज, फर्वेसगांज, पश्चिम बंगाल, सिलीगुडी, मालबाजर, अलीपुरदुर, आसाम, बारामा, रांगिया, बरसोला, तेजपुर, गोहपुर असा प्रवास करून ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे पोहोचल आहे. या प्रवासा दरम्याण त्यांनी प्रदुषनमुक्त भारत चा संदेश दिला. हा प्रवास पूर्ण करुन ते चंद्रपूरात पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी नामदेव राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

सायकल भ्रमंती द्वारे त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, प्रदुषण मुक्त भारत निर्माणासाठी संदेश दिला. सायकल भ्रमंती करून त्यांनी तब्बल 26 दिवसांत सुमारे 4 हजार किमोमीटरचा प्रवास पार केला आहे. त्यांच्या या उपक्रमांमुळे समाजसेवेची जाणीव दिसून येत असून त्यांच्या उपक्रमांचे कौतूक होत आहे. आज यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेवून सत्कार केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक, कलाकार मल्लारप, घुग्घूसचे शहर संघटक विलास वनकर, हरमन जोसेफ, मुन्ना रोडे, अशोक खडके यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here