नागपूरात शाळा-महाविद्यालये तर शेगावात श्री गजानन मंदिर बंद

0
212

नागपुर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमावलीला पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या रुग्णांवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून आता कठोर पावले उचलायला सुरूवात झाली आहे.

उपराजधानीत ७ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद 

कोरोनाचे वाढते संकट पाहता शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. नववी आणि दहावी या वर्गांच्या परीक्षा घेणे गरजेचे असल्याने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. खासगी शिकवणी वर्गांमध्येही कडक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली.

अमरावतीत सात दिवसांचे लॉकडाऊन

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली. यात अमरावती शहर व अचलपूर शहरात सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.