पहिल्याच जोगापुर जंगल सफारीत “वाघाचे दर्शन”

0
300
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पहिल्या सफारीचा जामुनकर परिवाराने लुटला आनंद

चंद्रपूर : नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या जोगापूर जंगल सफारीत पहिल्याच दिवशी पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले. जोगापूर जंगल सफारी करण्याचा पहिला मान नगर परिषद विभागात कार्यरत जामुनकर कुटूंबियांना मिळाला आहे.

चंद्रपुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जोगापूर जंगल सफारीचा शनिवारी आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला . पहिल्याच दिवशी तीन पर्यटकांच्या वाहनांना प्रवेश मिळाला.त्यापैकी एका वाहनात नगर परिषदमधील अधिकारी रवी जामुनकर हे आपल्या मुंबई येथील नातेवाइकांना घेऊन जंगल सफारी करीत होते . दरम्यान , सिरसी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७६ मधील निळा तलाव परिसरात वाघाचे दर्शन झाले.

पहिल्याच दिवशी वाघाचे दर्शन झाल्याने या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करता आला. त्यांनी वाघाचे छायाचित्रह टिपले. ही माहिती होताच रवी जामुनकर या पर्यटकाचे रविवारी सकाळी वन विभागाकडून विशेष अभिनंदन करण्यात आले . याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट , क्षेत्र सहायक मनोज देशकर, वनरक्षक संदीप कामलापूरवार , जीवन कावडे , प्रभाकर गिरसावडे , नहर पठाण उपस्थित होते.