चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील महाराष्ट्र – तेलंगाना सीमेवरील लक्कडकोट वन उपज तपासणी नाक्यावर एका कार मधून दीड लाखाचा गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपी अटक तर दुसरा फरार झाला.
राजुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी तीन वाजताचे दरम्यान तेलंगणा कडून मारुती कार क्रमांक एमएच 11 / एके 7318 आली. लक्कडकोट नाक्यावर थांबवून या कारची तपासणी केली असती त्यात 41 किलो 180 ग्राम ओलसर गांजा आढळला. या गांजाची किंमत 1 लाख 64 हजार 720 रुपये असून कारसह एकूण 11 लाख 74 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजुरा पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 20 व 22 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी वाहन चालक दिनेश निपेन दास, राहणार साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. दुसरा आरोपी सुनील हा फरार झाला. राजुरा पोलिस ठाण्यात एनडीपीएस अधिनियमाच्या कलम 20 व 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.















