“News Post’s” बातमीचा दनका ; तोतया उत्खनन अधिकारी महिलेविरुद्ध तक्रार

0
133
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : 19 जून शुक्रवारला सकाळी घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा येथे
उत्खनन अधिकारी असल्याची सांगून रेती तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या तोतया महिला व तिच्या साथीदारा विरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे.
22 जून सोमवरला सायंकाळी भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (जिल्हा अधिकारी कार्यालय,चंद्रपूर) श्रीमती अल्का नामदेवराव खेडकर यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गैरअर्जदार – प्रिया झांबरे व (स्काॅर्पिओ क्रमांक एमएच ३४ बीएफ ४४४९) मधील काही साथीदार यांचे विरुद्ध तक्रार दिली.
घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा गावाच्या रेती घाटांवरुन अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर ट्राली द्वारे सुरु आहे.
हिच संधी साधुन प्रिया झांबरे महिलेने स्काॅर्पीओ क्रमांक एमएच ३४ बीएफ ४४४९ मध्ये तिन इसमांना सोबत घेऊन वढा गावात दाखल होऊन त्यांनी गावचे पोलीस पाटील किसन वरारकर यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व आम्ही उत्खनन विभागातुन आलो आहे, असे सांगितले. पोलीस पाटील येताच
त्यांच्या सोबत रेता वाटांवर जाऊन एक ट्रॅक्टर पकडले व त्यालाही तेच सांगुन ट्रॅक्टर लावण्याची धमकी दिली. त्या ट्रॅक्टर धारकाकडुन हजारों रुपयाची मोठी रक्कम वसुल करुन तथाकथितांनी पोबारा केला.

“भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर व जिल्हा उत्खनन अधिकारी यांना माहिती दिली.”

त्यांचे आदेश मिळताच तथाकथित एका महिलेची व तिच्या तिन सहकारी विरुद्ध पोलीसांत तक्रार दिली.

घुग्घुस पोलीसांनी याप्रकरणात रेती तस्करांचे बयान नोंद केले असुन गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात येनार आहे. पुढील तपास सहा.पो.नि. विरसेन चंहादे करित आहे.

यात पैश्याची देवाण घेवाण करनारे रेती तस्कर व तोतया उत्खनन अधिकारी महिला व तिचे सहकारी अडकण्याची दाट शक्यता आहे.