आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : बुधवार 23 जून रोजी सकाळी 11 वाजता घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सार्वभौम आणि स्वतंत्र भारताच्या एकात्मतेसाठी प्राणार्पण करणारे थोर सेनानी जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करून मान्यवरांनी अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले भारतीय एकात्मता व अखंडतेचे प्रखर पुरस्कर्ते प्रखर राष्ट्रवादी जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन आहे. एक देश मे दो विधान दो प्रधान दो निशाण नही चलेंगे असा नारा त्यांनी दिला. जिल्ह्यात प्रत्येक बुथवर त्यांच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. भाजपा तर्फे जे बुथवर सहा कार्यक्रम घेण्यात येतात त्या पैकी हा महत्वाचा कार्यक्रम आहे. आज सायंकाळी 5 वाजता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर एक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व डॉ. सौरभ गनपते हे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार जनते पर्यंत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पोहचवीणार आहे. तरी याचा उपयोग घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. भाजपा डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी भारताचे अविभाज्य अंग असलेले काश्मीर साठी बलिदान दिले. त्यांचे विचार जनसामान्या पर्यंत पोहचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, भाजपा नेते बबलू सातपुते, विवेक तिवारी,श्रीकांत आगदारी, आतिष मेळावार, मोहनीश हिकरे, सौ. सुनीता चौहान, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे, खुशबू मेश्राम, शीतल कामातवार, प्रिया नागभीडकर, साक्षी बंडावार, अजय लेंडे, साईनाथ मस्के, दुर्गा सिंग उपस्थित होते.