“एकाच दिवशी दहा कोरोना रुग्ण” नागरिकांनी सावध रहावे : डॉ.वाकदकर

घुग्घुस : कोरोना संसर्गाचा प्रकोप दिवसां – दिवस वाढतच असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. एकीकडे लसीकरणाला सुरवात झाली तर दुसरीकडे रुग्ण संख्या ही वाढतच चालली आहे.

या आठवड्यात ऐकून 41 कोरोना रुग्ण मिळाले तर काल एकाच दिवशी दहा रुग्ण मिळाले आहे. वाढती कोरोना संख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवावे हात स्वच्छ धुवावे व सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावावे व कोरोना नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वाकदकर यांनी केले आहे.