घुग्घुस : राज्यातील तत्कालीन आघाडी शासनाने 9 जून 2014 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस याला 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय साठी मंजुरी दिली. मात्र त्यानंतर सत्ता परिवर्तन होऊन युतीचे शासन आले व तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार नाना शामकुळे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मिती कडे सर्रास दुर्लक्ष केल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला होता.
यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे शासन आले घुग्घुस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी ग्रामीण रुग्णालयाचा विषय पालकमंत्री विजय वड्डेटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांचयकडे ठेवला पालकमंत्री व आमदार यांनी या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष दिल्याने रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला असून इमारतीच्या बांधकामाचा कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला असून आठ कोटी सात लाख ऐक्यानवं हजार चारशे रुपयांचा राशीतुन सदर निर्माण कार्य होणार आहे.
घुग्घुस हा औद्योगिक शहर असून मिनी इंडिया नावाने प्रसिद्ध आहे येथे मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग, कष्टकरी शेतकरी असून ग्रामीण रुग्णालयाचा या सर्वाना मोठा लाभ होणार असून छोट्या – छोट्या उपचारासाठी चंद्रपूर जाण्याचा त्रास वाचणार आहे.