शुभम फुटाणे हत्याकांडाची CID मार्फत चौकशी करा – फुटाणे कुटुंबियांची मागणी

0
409
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : 17 जानेवारीला शुभम फुटाणे नामक युवकाचे घुग्घूस शहरात अपहरण करण्यात आले होते, या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व घुग्घूस पोलिसांनी तपास केला मात्र अनेक दिवस उलटले तरी यामध्ये पोलिसांना काही आढळले नाही.

मात्र तब्बल 28 दिवसानी शुभमचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले, या प्रकरणी गणेश पिंपळशेंडे याला अटक करण्यात आली. आरोपी गणेश हा 7 वर्षीय वीर खारकर बालकाच्या अपहरणाचा आरोपी होता, मात्र राजकीय दबावात त्याला जामीन देण्यात आला.

आरोपी गणेश पिंपळशेंडे ने 2 महिन्यांतच अभियंता असलेला शुभम फुटाणे या युवकांचे अपहरण करीत हत्या केली. आरोपी गणेशने सदर गुन्ह्याची कबुली दिली मात्र हत्येमागचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे कारण शुभमच्या अपहरणानंतर पोलीस गणेशवर पाळत ठेवून होते व त्याने पोलिसांना दिलेल्या बयाणात आम्ही 24 तास गणेशवर पाळत ठेवत होतो जेव्हा आरोपीवर पोलीस लक्ष देत होते त्या काळात आरोपी गणेश हा शुभमचा मृतदेह ज्या ठिकाणी लपविला होता त्या परिसरात दिवसातून दोन वेळा जात होता.

पोलिसांच्या तपासातील निष्काळजीपणा मुळे शुभमचा नाहक बळी गेला, पहिल्या अपहरण प्रकरणी गणेशला अटक झाली असती तर आज शुभम जिवंत असता.
शुभमच्या हत्येत अजून काही जणांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप आज शुभमचे वडील दिलीप फुटाणे व बहीण सोनल फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत केला. शुभम फुटाणे हत्याकांडाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी शुभमच्या वडिलांनी पत्रपरिषदेत केली आहे.

शुभमच्या अपहरणानंतर आरोपी गणेशने शुभमच्या घरी फोन करीत तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, जर तो परत हवा तर 30 लाख रुपये द्यावे लागतील पोलीस कडे तुम्ही जाणार तर तुमचा मुलगा जिवंत राहणार नाही, असे तब्बल 7 मिनिटांचे संभाषण झाले होते.
तरीही घुग्घूस पोलीस हत्येच कारण शोधू शकले नाही व यामध्ये अजून कुणी आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी शुभमच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली आहे.