त्या तोतया पत्रकाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
621
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : 22 डिसेंम्बरला वर्तमानपत्र वितरकाला एकाने स्थानीय वृत्त वाहिनीचा पत्रकार असल्याचे सांगत त्यांचेजवळील 6500 रुपये हिसकावले असल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी अनुराग अशोक दर्शन नामक युवकाला अटक केली.

मच्छीन्द्र वाळके नामक वर्तमानपत्र वितरक अरविंद नगर चौकात उभा असतांना एका युवकाने गाडी थांबवित तू वाहतुकीचे नियम मोडले, मी गाडीवरून पडलो असतो, मला लागलं असत, मी स्थानीय वृत्त वाहिनीचा पत्रकार आहो तुला पोलिसी हिसका दाखवितो म्हणत वाळके यांना दुचाकीवर बसविले मात्र काही अंतरावर दुचाकी थांबवित आपण इथेच सेटलमेंट करू म्हणत वाळके यांच्या खिशातील पैसे काढून तो युवक पसार झाला.
या संपूर्ण घटनेची तक्रार वाळके यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी शोधून काढली, मात्र ती दुचाकी दुसऱ्याची होती व त्यादिवशी एकाने नेली असल्याची माहिती दुचाकी धारकाने पोलिसांना दिली.
पोलिसांनी त्या युवकाला शोधत अटक केली, तपासात आधी तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागला मात्र पोलिसांच्या खाकी च्या दमने त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्या युवकाचे नाव अनुराग अशोक दर्शन असे आहे, तो लालपेठ येथे राहत होता, त्याचे वडील वेकोली मध्ये कार्यरत होते, वडिलांची वेकोली मधून निवृत्त झाले असता दर्शन कुटुंब हे तुकूम मध्ये रहायला गेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तोतया पत्रकारांवर याआधी गुन्हे दाखल आहे, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने या कारवाईचा उलगडा केला.