फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचा लाकूड जळून खाक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शुक्रवरला रात्री 10 वाजता पडोली पोलीस स्टेशन मागील महाराष्ट्र फर्निचर च्या दुकानाला भीषण आग लागली, आगीत लाखो रुपयांचा लाकूड व फर्निचर जळून खाक झाल्याची घटना घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचून अग्निशमन ला तात्काळ बोलावलं, चंद्रपूर महानगर पालिकेचे चार अग्निशमन घटना स्थळी पोहचून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते.

एका तासात आगीला नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना यश मिळाले, भीषण आगीला एका तासात आटोक्यात आणलं. आग कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.