तहसीलदार पोहचले घुग्घुसला ; ग्रामपंचायत निवळणूक बहिष्कार प्रकरण

0
439
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 

घुग्घुस : नगरपरिषदेच्या मागणी करीता 23 डिसेंम्बर रोजी घुग्घुस ग्रामपंचायतच्या प्रागणात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती.

यामध्ये 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी व्हायचे नाहीत असा एकमुखी ठराव घेण्यात आला यामुळे शासनात खळबळ माजली असून आज दिनांक 27 डिसेंम्बर रोजी ग्रामपंचायत कार्यलयात तहसीलदार निलेश गौड यांनी दुपारी 04 वाजता सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली तहसीलदार यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत सहभागी होण्याची विनंती केली.

ही विनंती सर्वपक्षीय नेत्यांनी धुळकवून लावली व ग्रामपंचायत निवडणूक लढायची नाही हा ठाम निर्धार सर्वांनी व्यक्त केली आहे.

आता निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी जेम – तेम तीन दिवस उरलेले आहेत.
घुग्घुस सारख्या मिनी इंडिया असलेल्या गावात राजकीय पक्षात इतक्या टोकाचा वैमनस्य असून देखील आजघडीला सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन इतिहास घडवितात की काय हे येणारा काळच सांगेल ?