राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात लसीकरण मोहीम सुरु

घुग्घुस : सोमवार 28 जून रोजी सकाळ पासून घुग्घुस येथील राजीव रतन चिकित्सालयात 18 ते 44 वर्षा वरील वयोगटाच्या नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीकरण सुरु करण्यात आले. त्यामुळे सकाळ पासूनच नागरिकांनी या केंद्रावर मोठी तुंबळ गर्दी केली. वेकोलीच्या ढिसाळ नियोजनाचा फटका रांगेत लागलेल्या नागरिकांना बसला. चिकित्सालया बाहेर किती लस साठा उपलब्ध आहे याची माहिती देणारे सूचना फलक न लावल्याने लसीकरणा साठी लांबच लांब रांगा लागल्या तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने रांगेत उभे असलेल्या एका व्यक्तीला भोवळ आली आणि तो खाली कोसळला त्यास याच चिकित्सालयात भर्ती करण्यात आले.

कोविशिल्ड लसीकरणासाठी महिलांनी तसेच अठरा वर्षा वरील युवतींनी रांगेत लागून लसीकरण करून घेतले. घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात सुविधांचा अभाव आहे. रांगेत असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.

येथील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डी.सी. आनंद यांनी दोनशे लस साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु शंभर लसीचा साठा उपलब्ध होत आहे असे त्यांनी सांगितले आहे.