
उद्या सर्वपक्षीय नेत्यां तर्फे मुंडण आंदोलन
नगरपरिषदे साठी सर्वपक्षीय नेते आक्रमक ‘करो -या -मरो’ ची भूमिका
घुग्घुस : ग्रामपंचायतला नगरपरिषदेत रूपांतर करण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर शुरू असून नगरपरिषदेची पहिली अधिसूचना 31 आगस्ट रोजी जाहीर करण्यात आली.
राज्यातील मुद्दत संपलेल्या चौदा हजार ग्रामपंचायतच्या व चंद्रपूर तालुक्यातील 38 ग्रामपंचायतच्या निवडणूका ह्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या आहे.
यात घुग्घुस ग्रामपंचायतचा ही समावेश असल्यामुळे दिनांक 23 डिसेंम्बर रोजी ग्रामपंचायत कार्यलयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली यात सर्वच राजकीय पक्षांनी होऊ घातलेल्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंम्बर पर्यंत नामांकन दाखल करण्यात येणार असून अजून पर्यंत कुणी ही नामांकन दाखल केला नाही.
रविवारी तहसीलदार निलेश गौड यांनी सर्वपक्षीय नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 28 डिसेंम्बर रोजी घुग्घुस येथील बस स्थानक परिसरात चक्का जाम करण्यात आल्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक खोळंबली होती. यावेळी घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता व दंगा नियंत्रण पथक ही तैनात ठेवण्यात आले होते.
सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला घेऊन गेले व त्यानंतर सर्वांना सोडण्यात आले.
उद्या सर्वपक्षीय नेत्यां तर्फे मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे.