रुग्णालयात भरती करणारा मुलगाच निघाला बापाचा हत्यारा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• देलनवाडी येथील घटना , आरोपीस अटक

चंद्रपूर : बापाला सायकलवरून पडल्याने मार लागल्याचे बनावट नाट्य रचून रुग्णालयात भरती केले. वडिलाच्या डोक्यावर उभारीने प्रहार केल्याने उपचारा दरम्यान वडीलाचा मृत्यु झाल्यानंतर शवविच्छेदनांनंतर सदर बाब उघडकीस आल्याने आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही घटना सिन्देवाही पोलीस स्टेशन अंतर्गत देलनवाडी येथे उघडकीस आली आहे.

आरोपी मुलाचे नाव विवेक अरुण गोबाळे (वय २६) असे असुन मृतक वडीलाच नाव अरुण गोपाळा गोबाळे (वय ५० ) असे आहे. वडील आईसोबत नेहमी भांडतो म्हणून रागाच्या भरात वडीलाला बैलबंडीच्या उभारीने 4 जुलै २१ला सायंकाळी मारहाण केली. वडील गंभीर जखमी झाल्याने त्याला सिन्देवाही रुग्णालयात भरती केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आणि त्या ठिकाणी वडील सायकलवरून पडल्याने मार लागल्याची खोटी माहिती दिली. उपचार सुरू असतांना 9 जुलै २१ ला वडीलाचा मृत्यु झाला .

मृत्यु झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या शवविच्छेदन अहवालात संशयास्पद बाबी आढळल्याने सिन्देवाही पोलीसानी अहवालाच्या आधारावर सखोल तपास केला असता मुलानेच वडीलाला उभारीने मारल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा करणे , गुन्ह्याची माहीती दळवने , आणि पुरावा नष्ठ करणे यावर कलम ३०२,२०१,१७७, अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.