घूग्घुस नगर परिषदेत निर्मीतीची प्रक्रिया गतशील करा – आ. किशोर जोरगेवार

0
326

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट, नगर परिषदेची फाईल मान्यतेसाठी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे वळती

चंद्रपूर : सर्व राजकीय पक्ष आणि घूग्घूस वासीयांची भावना लक्षात घेत येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूका रद्द करुन नगर परिषद स्थापन करण्याच्या दिशेने वेगवान प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी केली असून या संदर्भात आज मुंबई येथील मंत्रालयात त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत घुग्घूसच्या वस्तूस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी ना. मुश्रीफ यांनीही सदर प्रकरणाची फाईल तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबधित विभागाचे उपसचिव माळी यांना दिले त्यानूसार सदर फाईल ग्रामविकासमंत्री राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पोहचती झाली असून त्यावर त्यांनी स्वाक्षरी करून सदर फाईल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठवली आहे. त्यामुळे आता घूग्घूस नगर परिषदेसंदर्भात हालचालींना वेग आला आहे.
घुग्घूस ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेमध्ये करण्यात ही मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी लावून धरली आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या संदर्भात पाठपुरावा सुरु ठेवला आहे. परिणामी याबाबत हरकती व सुचनाही मागविण्यात आल्या आहेत. मात्र आता ग्रामपंचायतच्या निवडणूका लागल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्याण आज आ. किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी संदर्भात मुबंई मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली असून त्यांना घूग्घूस येथील वस्तूस्थितीबाबत अवगत केले आहे.
३२ हजार ६५४ लोकसंख्या असलेले हे गाव असून विविध महत्वाचे उद्योग येथे आहे. त्यामूळे नगर परिषदेसाठी पात्र असतांनासूध्दा येथील कारभार हा ग्रामपंचायतीच्या भरोश्यावर चालत आहे. त्यामूळे येथे नगर परिषद निर्माण करण्यात यावी अशी जूनी मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये या दिशेने हालचालीही सुरु झाल्या आहेत. सुचना व हरकती मागविण्यात आल्या आहे.
दरम्याण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक ठराव पाठविला आहे. मात्र हा ठरावा जुन्या आमसभेत घेण्यात आलेला असल्याने तो नगर परिषद निर्मीतीला विरोध दर्शविनारा असल्याची माहितीही यावेळी आ. जोरगेवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली असून आजची परिस्थीती वेगळी असून आज घडीला पंचायत समिती व जिल्हापरिषद सदस्यांनी येथील नगर परिषदेच्या निर्मीतीसाठी होकार दिला असल्याचेही त्यांनी या चर्चे दरम्याण सांगीतले. तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी घूग्घूस नगर परिषदेच्या मागणीसाठी पंचायत समीतीच्या निवडणूकांवर बहिष्कार टाकला असल्याचेही त्यांनी यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या लक्षात आणून दिले.
या सर्व पार्श्वभूमीवर जानेवारीच्या ४ तारखीच्या आत येथील नगर परिषद निर्मीतीबाबत अध्यादेश जारी झाल्यास येथील ग्रामपंचायत निवडणूक रद्द होणे शक्य असून त्या दिशेने गतीशील प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी मंत्री मोहदय यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यांनतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर संर्भातील फाईल तात्काळ सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाचे उपसचिव माळी यांना दिले. त्यानूसार माळी यांनी सदर फाईल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठविली राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही यावर स्वाक्षरी करून फाईल मान्यतेसाठी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठवली आहे. तसेच या संदर्भात आ. किशोर जोरगेवार यांनी नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांचीही भेट घेतली असून सदर विषयाला गती देण्याची मागणी केली आहे. त्यामूळे घूग्घूस नगर परिषदेच्या निमीर्तीच्या कामाला गती मिळाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेही घुग्घूस नगर परिषदेच्या निर्मितीसाठी प्रयन्त्नशील आहेत. त्यामुळे आता हा विषय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.