कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात विभागीय षडयंत्र ??

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : डॉ. परमेश्वर वाकदकर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस या ठिकाणी सन 2014 पासुन मुख्यालयी राहून विना तक्रार निरंतर घुग्घुस परिसरात आरोग्य सेवा देत आहे. मागील 5 वर्षात एकही वैद्यकीय अधिकारी घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी रुजू झाले नाही. घुग्घुस परिसराजवळील 16 गावे आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील घुग्घुसच्या सीमेलगतच्या भागातील काही गावांचा पूर्णभार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर वर पडत होता. येथील जनतेची महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी वारंवार मागणी होती.

अशा परिस्थितीत डॉ. परमेश्वर वाकदकर यांनी त्यांची पत्नी डॉ. सौ.अर्चना वाकदकर (एमबीबीएस, एमडी) यांना बोलावून घेतले. जे वैद्यकीय महविद्यालय नागपूरला सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या लहान 3 वर्षाच्या मुलीचा विचार करून त्यांनी घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ पदाची नियुक्ती घेण्याची तयारी केली आणि 2019 पासून प्राथमिक आरोग्य केन्द्र घुग्घुस या ठिकाणी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून मुख्यालयी राहुन विना तक्रार या कोरोना काळात सतत आपल्या 3 वर्षाच्या मुलीला सोबत घेवुन आरोग्य सेवा देत आहे.

डॉक्टर वाकदकर दांम्पत्य चांगली आरोग्य सेवा देत असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सुद्धा त्याच्या कामाची प्रशंसा केली होती. पण 11 महिनाचा कालावधी समाप्त झाल्या नंतर मा. जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर, आणि तालुका आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांनी सुड भावनेने हेतुपरस्पर डॉ. अर्चना वाकदकर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, एमडी, मायक्रो) यांना डावलून त्यांचा जवळीक का बीएएमएस उमेदवाराची नियुक्ती करण्याची लेखी शिफारस मा. जिल्हा शल्य चिकित्सक (सिएस) साहेब मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना केलेली आहे.

याबाबत मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विचाराना केली असता त्यानी धमकी दिली की, तुला काय करायचे ते कर. मला वाटेल त्या उमेदवारांना पदावर नियुक्ती देईल असे उतर दिले. तालुका आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना विचाराना केली असता त्यांनी पण उडवाउडवीचे उतरे दिली आहेत.

मला मा. जिल्ह्या आरोग्य अधिकारी जे सांगितले ते मी केले असे उत्तर देत आहे. घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रे हे घुग्घुस नगरात आहे लोकसंख्या ही 50,000 हजाराच्या जवळपास असलेले नगर आहे. या ठिकाणी अपघात, सर्पदंश, विषप्राशन, मारमारीचा पोलिस प्रकरण नेहमी केंद्रात दाखल होत असतात या सगळ्या रुग्णांवर वेळेवर उपचार एक बीएएमएस डॉक्टर कसा करु शकतो हे पण विचार केलेला दिसत नाही.
डॉ. अर्चना वाकदकर यांना येथेच नियुक्ती का देण्यात येत नाही या बाबत काहीच उतर मिळत नाही.
तसेच शासन निर्णयनुसार एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असताना बीएएमएस डॉक्टर यांना नियुक्ती देवु नये असे असताना नियमाला डावलून ऐका अपात्र उमेदवार साठी लेखी शिफारस करण्यामागचा नेमका काय हेतू आहे.

अश्या मनमानी कारभार विरुद्ध त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यानी मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना तक्रार दाखल केली आहे.
याबाबत चौकशी करून मला न्याय मिळवून देण्यात यावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमी असेच मानसिक खच्चीकरण केले जात आहे. एक एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असताना एका बीएएमएस नविन उमेदवाराची शिफारस करणे हे नियमबाह्य असताना वरिष्ठ अधिकाऱ्याचा असा मनमानी कारभार सुरू आहे. या बाबत चौकशी करून दोषी वर कारवाई झालीच पाहिजे.