गावकऱ्यांनी पकडले दोन अवैध रेतीतस्करांचे ट्रॅकटर, तहसील कार्यालयात केले जप्त

0
153

चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या खुंटाला येथील नागरिकांनी अवैध रेती भरून जात असलेल्या दोन ट्रकटरला अडवून गावात रोखून ठेवले आणि महसूल विभागाला माहिती देऊन त्या ट्रॅकटर कारवाई करायला लावून तहसील कार्यालयात जमा करायला लावून अवैध रेतीतस्करांच्या मुसक्या आवळल्या आहे .

सविस्तर वृत्त असे की मागील ४ महिन्यापासून खुंटाला गावापासून जवळ असलेल्या गोरवट घाटावर अवैध रेतीतस्करांचे धुमाकूळ सुरू असून लपूनछपून रेतीतस्करी सुरू होती मागील अनेक दिवसांपासून खुंटाला येथील नागरिक रेतीतस्करीला आळा घालण्याच्या प्रयत्नात होते परंतु यश आले नाही परंतु मंगळवारी सकाळी दरम्यान गावकऱ्यांना माहिती मिळाली की दोन ट्रकटर गोरवट घाटावर रेतीतस्करीसाठी आले आहेत लगेच गावकऱ्यांनी गावाजवळील मार्गावर सापळा रचून अनेक नागरिकांच्या उपस्थितीत दोन रेतीभरून असलेल्या ट्रकटरला अडविले आणि महसूल विभागला माहिती देऊन कारवाई करण्यासाठी बोलविले सदर ट्रकटर वर कुठलाही नंबर नसून दोन्ही ट्रकटर बिना नंबरचे आहेत त्यामुळे हे ट्रकटर कोणाच्या मालकीचे आहेत हे कळू शकते नाही सदर माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी खुंटाळा येथे दाखल झाले यात नायब तहसीलदार कोवे, महसूल अधिकारी हजारे प, तलाठी निखाडे उपस्थित झाले सदर ट्रकटर मधील रेतीचा पंचनामा करीत दोन्ही ट्रेकटरवर कारवाई करीत तहसील कार्यालय चिमूर येथे पाठविण्यात आले व जप्त केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here